Guru-Padukashtak

Mhetre Ayurveda : Guru-Padukashtak

गुरुविण कोण दाखविल वाट

वाट म्हणजे मार्ग, दाखवणे म्हणजे दर्शन करवणे, वाट दाखवणे म्हणजेच मार्गदर्शन करणे

बालपणापासूनचे संस्कारांपासून ते शालेय शैक्षणिक जीवन, लौकिक व्यवहारातील अडचणी आणि सर्वोच्च स्तरावरील पारमार्थिक प्रवासातील प्रश्न , या सर्वांच्या बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला वेळोवेळी विविध व्यक्ती, या गुरुच्या रूपाने जीवनात लाभत असतात. या सर्व गुरूंना कृतज्ञता म्हणून लिहिलेले, अतिशय भावपूर्ण स्तोत्र म्हणजे गुरुपादुकाष्टक !

दहा ओव्या असलेले हे गुरुपादुकाष्टक स्तोत्र अतिशय गेय, हृदयंगम, मनाला भिडणारे, आचरणात आणण्याजोगे, मानवी जीवनातील सकारात्मक बाबींबाबत कृतज्ञतेची जाणीव मनात रुजवणारे , असे अतिशय प्रासादिक भजन आहे.

हे गुरुपादुकाष्टक स्तोत्र किंवा भजन; शुद्ध उच्चारण, अर्थ स्पष्टीकरण व उदाहरणासह निरूपण अशा पद्धतीने अभ्यासण्यासाठी आणि आपल्या जीवनात आचरण्यासाठी, पुढील अभ्यासक्रम जॉईन करावा. कृतज्ञता हे मानवी जीवनातील सर्वोच्च मूल्य आहे, म्हणून या कोर्समध्ये गुरुपादुकाष्टक शिकण्यासाठी, नाममात्र सेवा मूल्य गुरुचरणी समर्पित करणे, हे कल्याण कारक सत्कार्यच मानावे.

Fees :
For INDIA : Rs. 108/- (Duration 30 Days)
For NRI : USD $5 (Duration 30 Days)